Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > उद्या बँकांचे कामकाज ठप्प होणार! लेबर कोडच्या विरोधात कर्मचारी आक्रमक; भारत बंदची हाक

उद्या बँकांचे कामकाज ठप्प होणार! लेबर कोडच्या विरोधात कर्मचारी आक्रमक; भारत बंदची हाक

Bank Strike : १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी बँक कर्मचाऱ्यांचा संप होणार आहे, ज्यामुळे बँक शाखांमधील कामकाज विस्कळीत होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:40 IST2026-02-11T15:23:58+5:302026-02-11T15:40:28+5:30

Bank Strike : १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी बँक कर्मचाऱ्यांचा संप होणार आहे, ज्यामुळे बँक शाखांमधील कामकाज विस्कळीत होऊ शकते.

Nationwide Bank Strike on Feb 12 Public Sector Banks to be Hit Hard | उद्या बँकांचे कामकाज ठप्प होणार! लेबर कोडच्या विरोधात कर्मचारी आक्रमक; भारत बंदची हाक

उद्या बँकांचे कामकाज ठप्प होणार! लेबर कोडच्या विरोधात कर्मचारी आक्रमक; भारत बंदची हाक

Bank Strike 12th Feb : देशातील विविध बँक कर्मचारी संघटनांनी उद्या, गुरुवार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन 'लेबर कोड'ला विरोध आणि 'पाच दिवसांचा कामाचा आठवडा' या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. हा संप केवळ बँकांपुरता मर्यादित नसून, १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'चा तो एक भाग आहे. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

बँकिंग सेवांवर संपाचे सावट
'ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन', 'एआयबीओए' आणि 'बीईएफआय' यांसारख्या प्रमुख संघटना संपात सामील असल्याने बँक ऑफ बडोदा बँकेने बीएसईला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, संपाचा फटका शाखांच्या कामकाजाला बसू शकतो. एसबीआयने देखील ग्राहकांना सावध केले असून बँकिंग सेवा मर्यादित प्रमाणात प्रभावित होऊ शकतात. आयडीबीआय बँकेलाही कर्मचारी संघटनांकडून संपाची नोटीस प्राप्त झाली आहे.

संपाची प्रमुख कारणे काय?

  • कामगार संघटनांचा मुख्य विरोध सरकाराच्या नवीन ४ लेबर कोड्सना आहे.
  • कायद्यात बदल: हे नवीन कोड २९ जुन्या कामगार कायद्यांची जागा घेणार आहेत.
  • अटी कडक: संघटनांच्या नोंदणीसाठी कडक अटी लादल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
  • वर्क-लाईफ बॅलन्स: बँक कर्मचारी प्रदीर्घ काळापासून '५ दिवसांचा कामाचा आठवडा' लागू करण्याची मागणी करत आहेत.

RBI कडून अधिकृत सुट्टी नाही!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही बँकेने १२ फेब्रुवारीला अधिकृत सुट्टी जाहीर केलेली नाही. बँका तांत्रिकदृष्ट्या उघड्या राहतील, परंतु कर्मचारी संपावर गेल्याने काउंटरवरील कामे, धनादेश वटवणे आणि कर्ज प्रक्रिया यांसारख्या सेवांमध्ये व्यत्यय येईल. खाजगी बँकांमध्ये संपाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे.

वाचा - दागिने हरवल्याचा दावा फेटाळणे पडले महागात; ग्राहकाला व्याजासह मिळणार ४३ लाखांची भरपाई

ग्राहकांनी काय करावे?

  • डिजिटल सेवा सुरू : नेट बँकिंग, मोबाईल ॲप, यूपीआय आणि एटीएम सेवा सुरू राहतील, कारण या सेवा स्वयंचलित आहेत.
  • मोठे व्यवहार टाळा : डिमांड ड्राफ्ट किंवा मोठी रक्कम काढायची असल्यास संप संपण्याची वाट पाहावी लागेल.
  • शाखेशी संपर्क साधा : तुमची शाखा उघडी आहे की नाही, याची खात्री करूनच घराबाहेर पडा.
     

Web Title : कल बैंकों का कामकाज ठप! भारत बंद में कर्मचारी शामिल; मुख्य मांगें

Web Summary : बैंक कर्मचारी कल, 12 फरवरी, 2026 को हड़ताल पर रहेंगे, नए श्रम कानूनों का विरोध करेंगे और पांच दिवसीय कार्य सप्ताह की मांग करेंगे। भारत बंद का हिस्सा होने के कारण सार्वजनिक क्षेत्र के बैंकों में कामकाज बाधित होने की संभावना है। डिजिटल सेवाएं चालू रहेंगी, लेकिन शाखा सेवाएं प्रभावित हो सकती हैं।

Web Title : Bank Strike Tomorrow: Services Disrupted Amid Bharat Bandh; Key Demands

Web Summary : Bank employees strike tomorrow, February 12, 2026, opposing new labor codes and demanding a five-day work week. Part of a larger Bharat Bandh, it will likely disrupt public sector banking services. Digital services remain operational, but branch services may be affected.